News Flash

प्रचार कार्यालयात लगबग

एरवी विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात फारशी लगबग नसली आज तरी आज मात्र मतदानाच्या निमित्ताने पदाधिकारी आपापल्या प्रचार कार्यालयात विविध भागातील मतदानाचा आणि व्यवस्थेचा आढावा घेत

| October 16, 2014 01:29 am

एरवी विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात फारशी लगबग नसली आज तरी आज मात्र मतदानाच्या निमित्ताने पदाधिकारी आपापल्या प्रचार कार्यालयात विविध भागातील मतदानाचा आणि व्यवस्थेचा आढावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या सूचना करीत होते. मतदारांची नावे शोधून देण्यासाठी विविध प्रचार कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदारांची गर्दी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतरही पक्षांच्या प्रचार कार्यालयात दिसून आली.
विविध राजकीय पक्षांची निवडणुकीच्या निमित्ताने मुख्य प्रचार कार्यालये असली तरी त्या-त्या पक्षातील विविध मतदारसंघात उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार कार्यालये सुरू केली होती. त्यामुळे मुख्य कार्यालयापेक्षा विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात वर्दळ दिसून आली. पूर्व नागपुरातील भाजपच्या सतरंजीपुरा आणि वर्धमाननगरातील प्रचार कार्यालयात कार्यकर्ते एकत्र जमून मतदारसंघाचा आढावा घेत होते. काही ठिकाणी मतदार केंद्रावर मतदार याद्या न पोहोचल्यामुळे त्या पोहोचवून दिल्या जात होत्या. ज्या ठिकाणी बुथ लागले नव्हते त्या ठिकाणी बुथची व्यवस्था करण्याच सूचना दिली जात होती. मध्य नागपुरात भाजप आणि काँग्रेसच्या गोळीबार चौकातील प्रचार कार्यालयात कार्यकर्ते बसले होते.काँग्रेसचे मोमीनपुरा भागातील प्रचार कार्यालयात कार्यकर्ते आणि काही ज्येष्ठ नागरिक बसून मतदानाचा आढावा घेत बसले होते. जे मतदार बाहेर निघाले नाही अशांना बाहेर काढण्यासाठी यादी तयार केली जात होती. उत्तर नागपुरात इंदोरा चौकातील बसपा आणि भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्चे आणि पदाधिकाऱ्यांची लगबग दिसून आली मात्र इंदोरा चौकातील काँग्रेसच्या कार्यालयात सर्व कार्यकर्ते आपपल्या वस्तीमध्ये मतदारांना बाहेरर काढण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. धरमपेठमध्ये भाजपाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिक बसले होते. तेथे कार्यकर्त्यांचा पत्ता नव्हता. भाजपच्या गणेशपेठमधील कार्यालयात दुपारच्यावेळी फारशी वर्दळ नव्हती तर काँग्रेसच्या देवडिया भवनाला कुलुप होते. राष्ट्रवादीच्या गणेशपेठमधील कार्यालयात आणि शिवसेनेच्या रेशिमबाग मधील मुख्य कार्यालयात फारशी लगबग दिसून आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:29 am

Web Title: voters rush at party campaging office to find the names in electoral list
Next Stories
1 वाहनांतून मतदारांची ने-आण
2 कुठे तंबू तर कुठे झाडाची सावली!
3 नेहमीची रड; यादीत नाव नाही
Just Now!
X