News Flash

स्वतंत्र महामंडळाच्या मागणीसाठी वंजारी महासंघाचे आज उपोषण

वंजारी समाजासाठी स्वतंत्र आíथक विकास महामंडळ स्थापन करावे, तसेच आरक्षणात दहा टक्के वाटा ठेवावा, यासह विविध मागण्यांसाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात

| December 23, 2013 01:25 am

वंजारी समाजासाठी स्वतंत्र आíथक विकास महामंडळ स्थापन करावे, तसेच आरक्षणात दहा टक्के वाटा ठेवावा, यासह विविध मागण्यांसाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे प्रांताध्यक्ष रामराव लव्हारे यांनी दिली.
    राज्यात  सुमारे ८० लाखांपेक्षा अधिक वंजारी समाज असंघटित आहे. त्यांना भटक्या विमुक्त प्रवर्गातून दोन टक्के आरक्षण मिळते. परिणामी, गुणवत्ता असूनही तरुणांना नोकरीची संधी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे याच प्रवर्गात आरक्षण वाढवून दहा टक्के करावे. राज्यातील इतर सर्व समाजासाठी स्वतंत्र आíथक विकास महामंडळे आहेत. मात्र, या समाजासाठी वसंतराव नाईक महामंडळातूनच नाममात्र लाभ दिला जातो. त्यामुळे या समाजासाठी स्वतंत्र आíथक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वी महाराष्ट्रात या समाजाचे १२ ते १६ आमदार निवडून येत असत. मात्र, आता केवळ दोन आमदार निवडून येत आहेत. व्यापार आणि कारखानदारीतही मोठय़ा प्रमाणात पिछेहाट झाली आहे. संत भगवानबाबा यांच्या जयंतीला शासकीय मान्यता व अनुदान द्यावे, अशीही महासंघाची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:25 am

Web Title: wanjara society independent federation demand fast bid
टॅग : Bid,Demand
Next Stories
1 ‘पृथ्वीराज म्हणजे दुसरे मनमोहनसिंग’!
2 अडवाणींचा ‘सूर’ आघाडीचाच!
3 तरुणांनी राजकारणात करिअर करावे – मुंडे
Just Now!
X