02 December 2020

News Flash

‘मेनन बेअरिंग’मधील कामगारांचा आंदोलनाचा इशारा

गोकुळ शिरगाव येथील मेनन बेअरिंग लिमिटेड या कंपनीने हंगामी काम करणाऱ्या १७२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून कामगारांना सरकारी सहायक कामगार

| April 27, 2013 01:31 am

गोकुळ शिरगाव येथील मेनन बेअरिंग लिमिटेड या कंपनीने हंगामी काम करणाऱ्या १७२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून कामगारांना सरकारी सहायक कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने तत्काळ कामावर घ्यावे. कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करून त्याच्यावर फौजदारी दावा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कामगार आंदोलनाचे नेते व आम आदमी पक्षाचे प्रमुख नारायण पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कंपनीने कामगारांना कामावर घेतले नाही, तर उद्या शनिवारपासून प्रवेशद्वारावर बेमुदत हरताळ आंदोलन सुरू करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.    
गोकुळ शिरगाव येथे असलेल्या मेनन बेअरिंग कंपनीच्या व्यवस्थापनाने १८ एप्रिल रोजी ९ हंगामी कामगारांना कामावरून कमी केले. व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या निर्णयाबद्दल कामगारांची बैठक झाली. त्यांनी व्यवस्थापनाकडे याची विचारणा केली. मात्र त्याला उत्तर देण्याऐवजी व्यवस्थापनाने चर्चेसाठी इकडे यायचे नाही, असा दम भरला. शिवाय दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल १७२ हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे कळविले. या कंपनीत ८० कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.     
कामावरून काढून टाकलेल्या हंगामी कामगारांनी सरकारी कामगार कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. त्या आधारे २२ एप्रिल रोजी सरकारी कामगार अधिकारी सावंत, मेनन कंपनीच्या वतीने कामगार अधिकारी सचिन माने, सुरक्षा अधिकारी मोरे, कंत्राटदार रघुनाथ कुलकर्णी तर कामगारांच्या वतीने नारायण पवार, महेश जनवाडे, सोपान मगदूम, प्रताप गायकवाड, किरण महाजन, आनंदा पाटील आदींनी भाग घेतला. बैठकीवेळी श्री.सावंत यांनी हंगामी कामगारांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी विहित प्रक्रिया पार पाडावी लागते, असे सांगून सर्व कामगारांना कामावर घेण्याचा आदेश दिला.     
यानंतरही व्यवस्थापनाने हंगामी कामगारांना कामावर घेतले नाही. कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या भूमिकेविरुद्ध शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले जाणार आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षाचा पाठिंबा आहे, असे पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:31 am

Web Title: warning of agitation by menon bearing workers
टॅग Warning
Next Stories
1 ‘व्होडाफोन’ची प्री-पेडसाठी नवी रोमिंग योजना
2 आरोग्य विभागातील घोटाळय़ाबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव
3 ठेका एका ठिकाणचा, उपसा मात्र दुसरीकडून
Just Now!
X