सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी सेवा करू नये, असा नियम मोडणाऱ्यांवर या पुढे पुनर्विलोकन समितीची करडी नजर असणार आहे. नुकतेच शहरातील डॉ. अश्विन सोनकांबळे हे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना दिसून आल्यानंतर त्यांच्याकडून २२ टक्के नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्सची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी घेतला.
डॉ. सोनकांबळे नोकरीला लागल्यापासूनची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम सुमारे १९ लाख रुपये असल्याचा दावा बनावट वैद्यकीय व्यवसाय आळा पुनर्विलोकन समितीचे सदस्य डॉ. पवन डोंगरे यांनी केला. अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात जिल्ह्य़ात मोहीम सुरू करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार बैठक घेऊन त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी रुग्णालयात नोकरी असतानाही खासगी रुग्णालयात सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात ही समिती काम करेल, असे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पुनर्विलोकन समितीत ३ अशासकीय सदस्य असून जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.
समितीचे सदस्य डॉ. डोंगरे यांनी पत्रकार बैठक घेऊन वैद्यकीय अधिकारी, कायद्याने परवानगी नसणारे रुग्णालय व रक्त आणि लघवी तपासणीचे केंद्र तपासणार असल्याचे सांगितले. बंगाली डॉक्टरांवरही कारवाईचा बडगा उचलला जाणार असून जिल्ह्य़ात ही मोहीम अधिक कडक करणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले.
नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्सविषयी डॉ. सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या अनुषंगाने न्यायालयात काही दावे प्रलंबित आहेत. मी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे या विषयी अधिक बोलता येणार नाही.

cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Nagpur police
‘मी पोलीस उपायुक्तांना गोळी घालणार…’ ‘त्या’ एका फोनने…
Nagpur police
‘मी पोलीस उपायुक्तांना गोळी घालणार…’ ‘त्या’ एका फोनने…