नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सातपूर विभागासह पश्चिम विभागात जलवाहिनी जोडणीचे काम सुरू असल्याने शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या वतीने सातपूर पाणीपुरवठा विभागातर्फे बळवंतनगर जलकुंभाजवळ कार्बन नाका ते रामराज्य जलकुंभ भरणारी ५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम सुरू आहे. शनिवारी तसेच रविवारी या ठिकाणी काम सुरू राहणार असल्याने पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या कामामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १६ व २१ येथील सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, काळेनगर, सद्गुरूनगर, कामगारनगर, गणेशनगर, गुलमोहर कॉलनी, सावरकरनगर, मते नर्सरी रोड, आनंदवली तसेच पश्चिम विभागात प्रभाग क्र. १५ व २२ मधील कृषीनगर, एस. टी. कॉलनी, मॉडेल कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामनगर, डिसूझा कॉलनी परिसरात तसेच गीतांजली सोसायटी, सहदेवनगर, दादोजी कोंडदेव नगर, सुयोजित पार्क, आयाचित नगर, चिंतामणी मंगल कार्यालय परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.