महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारीही निवडणुकींच्या कामात अडकल्याने २४ तास सुरू राहणाऱ्या या अत्यावश्यक सेवेसाठी कंत्राटदारांची मदत घेतली जाणार आहे. जलअभियंता खात्यातील १०६ अभियंते, १२४ कार्यालयीन कर्मचारी व ३३१ कामगार निवडणुकींच्या कामासाठी देण्यात आले आहेत. जलवाहिनी फुटणे, गळती होणे अशा आकस्मिक व तातडीच्या कामासाठी उर्वरित कर्मचारी तसेच कंत्राटदारांमार्फत काम करून घेण्यात येईल, असे जलअभियंत्याकडून सांगण्यात आले.