13 November 2019

News Flash

जलवाहिनी कामास मदिनानगरात प्रारंभ

सुजल-निर्मल योजनेंतर्गत मदिनानगरात टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामास महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारंभ झाला. मागील ३ वर्षांंपासून जलवाहिनीचे काम रखडले होते. महापौरांच्या पुढाकारातून या

| February 15, 2014 01:35 am

सुजल-निर्मल योजनेंतर्गत मदिनानगरात टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामास महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारंभ झाला. मागील ३ वर्षांंपासून जलवाहिनीचे काम रखडले होते. महापौरांच्या पुढाकारातून या कामास सुरुवात झाली.
रामेश्वर प्लॉट, मदिनानगर या प्रभाग क्रमांक २ व ७ मधील परिसरात ३ वर्षांपूर्वी जलकुंभ, तसेच जलवाहिनीसाठी नगरपालिकेने मंजुरी दिली. परंतु काम पूर्ण झाले नव्हते. सुजल-निर्मल योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या या कामासाठी महापौरांनी पुढाकार घेतला. एक हजार ८०० मीटर लांबीच्या जलवाहिनी कामास देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ झाला. उपमहापौर सज्जुलाला, स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, नगर अभियंता बालासाहेब दुधाटे, जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता गोपाळकृष्णन देशमुख, आरोग्य सभापती गुलमीर खान, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती रजिया बेगम युनूस, अॅड. जावेद कादर, जाकेरलाला आदी उपस्थित होते. दीड महिन्यात काम पूर्ण होईल व मेपर्यंत या भागातील सर्व मुख्य रस्ते होतील, अशी माहिती महापौरांनी दिली. युनूस सरवर यांनी आभार मानले.

First Published on February 15, 2014 1:35 am

Web Title: water pipeline work start in madina nagar