06 December 2020

News Flash

‘सनबीम’तर्फे दुष्काळग्रस्तांना मे अखेर टँकरने पाणी पुरवठा

माण-खटाव तालुक्यांत पाणी पुरवठय़ाची परिस्थिती भीषण असल्याने दहिवडी, गोंदवले व आसपासच्या विभागात टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सनबीम एज्युकेशन अॅण्ड रीसर्च ट्रस्ट कराड व श्रीनिवास

| April 27, 2013 01:33 am

माण-खटाव तालुक्यांत पाणी पुरवठय़ाची परिस्थिती भीषण असल्याने दहिवडी, गोंदवले व आसपासच्या विभागात टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सनबीम एज्युकेशन अॅण्ड रीसर्च ट्रस्ट कराड व श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे सुरू केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सारंग पाटील यांनी सांगितले.
माण तालुक्यात दहिवडीतील श्रीराम वार्ड व परिसरातील दहा वाडय़ा-वस्त्यांवर तसेच गोंदवले येथील कट्टे पाटील वस्ती, यादव वस्ती, बेटे वस्ती, फडतरे वस्ती या भागात में महिना अखेपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा वितरणप्रसंगी श्रीनिवास खरे, अनिल गावडे, दामोदर आरे, डॉ. सदींप पोळ, सिध्दार्थ गुंडगे, सरपंच धनाजी जाधव, बाळासाहेब गुंडगे, प्रदीप जाधव, अंगराज कट्टे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:33 am

Web Title: water supply to drought stricken still may end from sunbeam
Next Stories
1 ‘मेनन बेअरिंग’मधील कामगारांचा आंदोलनाचा इशारा
2 ‘व्होडाफोन’ची प्री-पेडसाठी नवी रोमिंग योजना
3 आरोग्य विभागातील घोटाळय़ाबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव
Just Now!
X