आर्ट ऑफ लििव्हगच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दहा टाक्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे महाराष्ट्र दिनी सुपूर्द करण्यात आल्या. आर्ट ऑफ लिव्हींगचे मराठवाडा समन्वयक मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली.
आर्ट ऑफ लिव्हींग दुष्काळानिमित्त जलजागृती अभियान हाती घेतले आहे. कातपूर येथे नाला दुरुस्ती व रुंदीकरण कामास प्रारंभ झाला. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विहिरीची व बोअरची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. शिरूर अनंतपाळ येथे घरणी नदीचे सरळीकरण, रुंदीकरण व गॅबियन बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच झाले. या नदीपात्रातील माती काढल्यामुळे नदीपात्रात पाणी थांबून जमिनीत पाणी जिरण्यास मदत होईल. गॅबियन बंधाऱ्यामुळे तीन किलोमीटपर्यंत पाणी थांबेल. शिरूर अनंतपाळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. लातूर शहरात ३०० घरांचे जलपुनर्भरण करण्यात येणार आहे. जिल्हय़ात गावोगावी जाऊन जलजागृती अभियान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस चंद्रकांत मडपल्लीकर, कैलास जगताप, सुहास बेळंबे, महादेव गोमारे, डॉ. शशी चौधरी, लालासाहेब देशमुख, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 8, 2013 2:37 am