शाळेच्या पहिल्याच दिवशी कसबे तडवळे (तालुका उस्मानाबाद) येथे जि. प. शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जि. प. उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. विद्यार्थ्यांना या वेळी पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कसबे तडवळे येथील जि. प. आदर्श केंद्रीय शाळा, जि. प. कन्या शाळा, जि. प. उर्दू प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते. जि. प. उपाध्यक्ष दुधगावकर, उपशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, गटशिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे, उपसरपंच सुरेश पाटील आदी उपस्थित होते. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन धायगुडे यांनी, तर प्रास्ताविक विस्तार अधिकारी जंगम यांनी केले.