08 December 2019

News Flash

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभागातर्फे आजपासून विज्ञान प्रदर्शन

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

| August 31, 2013 12:05 pm

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विज्ञान प्रदर्शन ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१३ या कालावधीत स्वामी विवेकांनंद इंटरनॅशनल हायस्कूल, पारेखनगर, कांदिवली (प.) येथे आयोजित केले आहे. प्रदर्शनात उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागाचे एकूण ६४९ प्रकल्प सादर केले जातील. या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. असून समारोप व पारितोषिक वितरण समारंभ १ सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी २ वा. होईल. हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी ३.३० वा. पर्यंत विज्ञानप्रेमींना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात बांद्रा ते दहिसर उपनगरातील सुमारे ६५० शाळा सहभागी होतील. या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण निरीक्षक नितीन बच्छाव यांनी केले आहे.

First Published on August 31, 2013 12:05 pm

Web Title: west education department of greater mumbai organise science exhibition
टॅग Science Exhibition
Just Now!
X