वेस्टर्न कोल फिल्ड्सने गेल्या वर्षी सामाजिक कामासाठी २० कोटी २१ लाख रुपये खर्च केले असून पुढील वर्षांत २७ कोटी रुपये खर्चाचे उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांनी सांगितले.
वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा तसेच मध्य प्रदेशातील बैतुल व छिंदवाडा जिल्ह्य़ात एकूण ८४ खाणी आहेत. या खाणींच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचेा हित ही वेकोलिची जबाबदारी असून त्यासाठी विविध सामाजिक उपक्रम ‘सीएसआर’ योजनेंतर्गत राबविले जातात. वेकोलिने २०११-१२ या वर्षांत ७ कोटी ८५ लाख रुपये खर्च केले. २०१२-१३ मध्ये २०५ उपक्रमांवर २० कोटी २१ लाख रुपये खर्च करण्यात आले. २२ कोटी ७२ लाख रुपये खर्चाचे २५५ उपक्रम अद्याप पूर्ण झालेले नाहीत. ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षी सामाजिक कार्यासाठी २७ कोटी रुपये खर्च केले जातील.
विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून ५१ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रति व्यक्ती ९ हजार १२२ रुपये खर्च करम्यात आले. कुटुंब कल्याण, नेत्र तपाणी आदी आरोग्य तपासणी शिबिरेही घेतली जातात. केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर खाणींच्या परिसरातील गावातील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे घेतली जात असून त्यासाठी फिरते चिकित्सालय चालविले जाते. विविध गावांमध्ये ९०६ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. ६८ हजार ५२९ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. गावांमध्ये तीस सामुदायिक केंद्र बांधण्यात आले. गावांमध्ये ४३.५६ किलोमीटर रस्तेही बांधून देण्यात आले आहेत. ४३ हातपंप बसविण्यात आले. शाळांमध्ये ३५ खोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. १६ क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ तसेच मध्य प्रदेश वन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ५०० हेक्टर जमिनीवर २००९ ते २९१४ या कालावधीत १२ कोटी ४० लाख झाडे लावण्याचे लक्ष्य असून गेलवर्षी १ लाख ६० हजार ६२५ झाडे लावण्यात आली. गेल्या वर्षांत पर्यावरण संवर्धनासाठी वेकोलिला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला. अखिल भारतीय खाण बचाव स्पर्धेक राष्ट्रीय स्तरावर तिसरी तर कोल इंडियांतर्गत वेकोलिने प्रथन स्थान प्राप्त केले. कोल इंडियातर्फे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम, कॅरम स्पर्धेक द्वितीय पुरस्कार मिळाला. फेब्रुवारीत झालेल्या जागतिक सीएसआर काँग्रेसतर्फे केयरिंग कंपनी अवार्ड, सीईओ विथ एचआरडी ओरिएंटेशन तसेच हिंदी कामकाजाला प्रोत्याहित केल्याबद्दल राजभाषा श्री आदी पुरस्कार दिनेशचंद्र गर्ग यांना मिळाले आहेत.