29 September 2020

News Flash

दिवसाच्या पाìकगचे काय?

वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांची जागा व्यापणाऱ्या गाडय़ांना शुल्क लावण्यासाठी महापालिका जय्यत तयारी करत असली

| January 24, 2014 06:16 am

वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांची जागा व्यापणाऱ्या गाडय़ांना शुल्क लावण्यासाठी महापालिका जय्यत तयारी करत असली तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. इमारतींच्या बाहेर गाडय़ा लावणाऱ्यांकडून रात्रीच्या वेळेचे शुल्क घेण्याचा विचार पालिका करत असली तरी दिवसभर तळ ठोकून असलेल्या गाडय़ांचे नेमके काय करायचे याचा विचारच करण्यात आलेला नाही.  इमारतीमध्ये पाìकगसाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक रहिवासी बाहेर रस्त्यांवर गाडय़ा ठेवतात. या गाडय़ा जागा अडवत असल्याने रात्री १० ते सकाळी ६ या वेळेसाठी शुल्क लावले जाणार असून महिन्याचा किंवा तिमाहीचा पास सवलतीच्या दरात मिळणार आहे. या गाडय़ा रोज वापरल्या जात असून रात्री पाìकगसाठी उभ्या केल्या जातात, असा विचार करून ही शुल्कआकारणी केली गेली आहे. मात्र कधीतरी फिरण्यासाठी हौसेने गाडी घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. पेट्रोल- डिझेलचे दर परवडत नसल्याने किंवा मुंबईच्या रस्त्यावर रोज गाडी काढणे सोयीचे नसल्याने गावी जाण्यासाठी किंवा वीकेण्डला फिरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एकाहून जास्त गाडय़ा असलेल्यांच्या घरातील वाहनेही रस्त्याची जागा अडवत दिवसचे दिवस उभी असतात. या सर्व गाडय़ांचा वाहतुकीला त्रास होतो. मात्र रात्रीचे शुल्क पालिका आकारणार असली तरी दिवसाच्या पाìकगशुल्काबाबत प्रस्तावित प्रकल्पात उल्लेख नाही.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी कमीत कमी खासगी गाडय़ा रस्त्यावर याव्यात या दृष्टीने पालिकेने पाऊल टाकले आहे. रात्री कमी वाहतूक असल्याने त्याकाळात पाìकग करणाऱ्यांसाठी कमी शुल्क आकारले जात आहे. मात्र दिवसाच्या पाìकगचा विचार करण्यात आलेला नाही, असे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार म्हणाले.
रात्री इमारतीबाहेर गाडय़ा उभ्या करण्यासाठी केवळ त्याच इमारतीतील सदस्यांना मुभा देण्यात येईल व त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. शहरातील काही रस्त्यांवर दिवसभर पाìकग होते, हे खरे आहे. मात्र सर्व मुद्दय़ांची अंमलबजावणी एकत्रित करता येणार नाही. शुल्क वसुलीची अंमलबजावणी सुरू झाल्यावर दिवसाच्या पाìकगबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन म्हणाले.
रात्रीच्या पाìकगचे शुल्क
रात्रीच्या वेळी इमारतीबाहेरील रस्त्यावर गाडी उभी करण्याची सवलत तेथील रहिवाशांना देण्यासाठी पालिकेने सोसायटी सदस्यांना परवाने देण्याचा विचार केला आहे. रात्री ८ ते सकाळी ८ या १२ तासांसाठी मासिक पास दिला जाईल. यासाठी परिसरात लागू असलेल्या वाहनशुल्काच्या एक तृतीयांश शुल्क प्रति तासाप्रमाणे घेण्याचे प्रस्तावित आहे. दक्षिण मुंबईसाठी ६० रुपये, पश्चिम उपनगरांसाठी ४० रुपये तर पूर्व उपनगरांसाठी २० रुपये शुल्क प्रति तासासाठी ढोबळमानाने ठरवण्यात आले आहे. गर्दी असलेल्या व नसलेल्या ठिकाणी या शुल्कात फरक केला जाऊ शकतो.

* वाहनतळांची क्षमता १२ हजार गाडय़ा
* रस्त्यावर पार्क करण्यात येत असलेल्या गाडय़ा तीन लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 6:16 am

Web Title: what about morning parking
टॅग Mumbai News,Parking
Next Stories
1 बेस्टचे कोटय़वधींचे सरकारी थकबाकीदार
2 मोनिका मोरेच्या मदतीसाठी नेहरूनगरमध्ये रविवारी पतंगोत्सव
3 वास्तवदर्शी लिखाणाला व्यासपीठ मिळवून देणारा ‘नॉन फिक्शन फेस्ट’
Just Now!
X