’माझे बजेट सात लाख रुपये आहे. मी होंडाची मोबिलिओ घ्यावी की डॅटसन गो प्लस घ्यावी? कृपया फायद्यातोटय़ासह तपशीलवार माहिती मिळाल्यास उत्तम.

– वैभव यू. जे.

’एक तर होंडा मोबिलिओची किंमत ही आठ लाखांपासून पुढे सुरू होते. शिवाय डॅटसन गो प्लस ही गाडी छोटी आहे. त्यात तुम्ही पाच जण बसू शकता. डॅटसन गो प्लस ही चार-पाच लाखांत तुम्हाला मिळू शकेल. ही १.२ लिटर इंजिनाची पेट्रोल कार आहे. ही एमयूव्ही किंवा एसयूव्ही नाही. साधी कार आहे. जर तुम्ही पाच जण असाल तर नक्की घ्या, पण जास्त माणसांकरिता गाडी घेण्याचे ठरवत असाल तर सात लाखांत शेवरोले एन्जॉय घ्या.

’मी वैद्यकीय व्यवसायात आहे. माझे रोजचे ड्रायिव्हग किमान ३० ते ३५ किमीचे असते. सध्या माझ्याकडे वॅगन आर एलएक्सआय ही गाडी आहे. मला माझी गाडी बदलायची असून सेडान घ्यायची आहे. पेट्रोल की डिझेल व्हर्जन घेऊ? माझे बजेट आठ ते दहा लाख रुपये आहे. कृपया मला पर्याय सुचवा.

– डॉ. सुचेता वळसंगकर

’मारुती सिआझ ही पेट्रोलवर चालणारी गाडी तुमच्यासाठी योग्य ठरेल. तसेच होंडाची सिटी ही गाडीही चांगली आहे. तुमच्याकरिता हे दोन उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही गाडय़ा तुम्हाला १७ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देतील.

’मला डॅटसन गो प्लस टी ही गाडी घेण्याची खूप इच्छा आहे. ही गाडी घेणे कितपत योग्य ठरेल? माझा छोटासा व्यवसाय असून माझे बजेट साडेचार ते साडेपाच लाख रुपये आहे. मला काही फारसा प्रवास करावा लागत नाही. कृपया मला माझ्या गरजेनुसार गाडी सुचवा.

– योगेश बोरसे, पुणे</p>

’डॅटसन गो प्लस ही खरोखरच एक चांगली गाडी आहे. पसा वसूल करून देणारी गाडी आहे. तसेच तिचा बूट स्पेसही प्रशस्त आहे. मायलेजही १७ किमी प्रतिलिटर एवढा आहे. तुम्हाला ऑटोगीअरच गाडी घ्यायची असेल तर अल्टो के१० आणि सेलेरिओ एएमटी व्हीएक्सआय हाही चांगला पर्याय आहे.