नवरा खुनी आहे व मेव्हण्याच्या खुनाच्या रक्ताने हात बरबटलेल्या नवऱ्याबरोबर पत्नी म्हणून नाते ठेवण्याची इच्छा राहिली नाही. त्यासाठी आपल्याला अशा खुनी नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून पंढरपूर न्यायालयात ग्रामीण भागातील एका अशिक्षित महिलेने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
या आगळ्यावेगळ्या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की करोळे (ता. पंढरपूर) येथील श्यामल हिचा विवाह त्याच गावातील विष्णू हणमंतर बंडगर याजबरोबर ३ जुलै २००७ रोजी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगा देखील झालेला. श्यामल हिच्या माहेरी तिची आई सुवर्णा यमगर व अज्ञान लहान भाऊ बापू यमगर राहत होते. लग्नानंतर नवरा विष्णू बंडगर हा सासू सुवर्णा व मेव्हणा बापू यांची जी शेतजमीन आहे, त्यात आपला देखील हिस्सा असल्याचा दावा करीत होता.  मेव्हणा बापू जर नसेल तर वारसा हक्काने सर्वच शेतजमीन आपपल्याला मिळेल, या विचाराने पछाडलेला होता. त्याच्या बोलण्याकडे पत्नी श्यामल हिने दुर्लक्ष केले.
दरम्यान, १३ नोव्हेंबर २०१० रोजी विष्णू हा मेव्हणा बापू यास विद्युत जोडणीचे कोटेशन भरण्यासाठी मोटारसायकलने उंबरे येथे घेऊन गेला. मात्र त्यानंतर बापू घराकडे परत आलाच नाही. त्याच्या आईने त्याबाबत करकंब पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, चौथ्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१० रोजी बापू हा मृतावस्थेत उंबरे ते करोळे रस्त्यावर आढळून आला. या घटनेचा तपास पोलिसांनी केला असता विष्णू याने मेव्हणा बापू याची शेतजमीन हडप करण्याच्या दुष्ट हेतूने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्यामल हिचा मानसिक धक्का बसला. आपल्या एकुलत्या एक भावाचा खून आपल्या नवऱ्याने करून माहेरच्या वंशाचा दिवा कायमचा विझवला होता. त्यामुळे व्यथित होऊन श्यामल हिने अशा खुनी नवऱ्याबरोबर संसार करायचा नाही असे ठरविले. त्यासाठी तिने पंढरपूरच्या  न्यायालयात अॅड. धनंजय माने, अॅड. अमर देशमुख व अॅड. जयदीप माने यांच्या मार्फत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. खुनी नवऱ्यापासून घटस्फोट मिळण्यासाठी केलेला हा अर्ज मंजूर होण्याची सोलापूर जिल्ह्य़ातील न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जाते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा