News Flash

वाईल्ड-सर संस्थेचे दोन घुबडांना जीवदान

सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्झव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च ही निसर्गसंस्था गेल्या पंधरा वर्षांपासून वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असून वन्यजीवांना वाचवणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे व त्यांच्या

| February 14, 2013 01:13 am

सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्झव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च ही निसर्गसंस्था गेल्या पंधरा वर्षांपासून वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असून वन्यजीवांना वाचवणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे या कामात सक्रिय आहे. या संस्थेने यंदाच्या वर्षी २५ पेक्षा जास्त पक्ष्यांचा जीव वाचविला आहे.
गेल्या ४ फेब्रुवारीला असमा आझाद यांना छावणी परिसरात एक गव्हाळी घुबड नायलॉन मांजामध्ये अडकलेले दिसले. त्यांनी वाईल्ड-सरच्या डॉ. बहार बाविस्कर यांना यासंदर्भात कळवले. त्यांनी घुबडाच्या त्वचेला काप देऊन मांजातून बाहेर काढले. त्याला प्रथमोपचार देऊन त्याचे प्राण वाचवण्यात आल्याचे डॉ. बाविस्कार यांनी सांगितले. चार-पाच दिवसानंतर घुबडाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत १ फेब्रुवारीला रमेश पवार आणि गोपाल सुब्रमणियम यांना गांधीबागेतील हार्मोनी हॉटेलजवळ एक घुबड मांजात अडकलेले आढळले. त्यांनी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स संस्थेच्या करिष्मा गलानी यांना याबाबत माहिती दिल्यावरून त्यांनी या घुबडावर उपचार करण्यासाठी डॉ. बहार बाविस्कर यांच्याकडे पाठवले. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्याला बरे करण्यात आल्याचे डॉ. बाविस्कर यांनी सांगितले. त्यानंतर त्यालाही त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशाप्रकारे वाईल्ड-सर संस्थेने दोन्ही घुबडांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले. पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेले पशुपक्षी आढळून आल्यास ९९७५६८०३७५, ९५६१४०४१७४, ८२३७६०४१८८ किंवा ८९७५७३७९९१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 1:13 am

Web Title: wild sir institution gives the life to two owl
Next Stories
1 इच्छुकांच्या आकांक्षांना आवरण्यासाठी पक्षनेत्यांना करावी लागणार कसरत
2 गोंदिया जिल्ह्य़ातील ४५५ गावांना यंदा जाणवणार तीव्र पाणी टंचाई
3 जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संरक्षणाचा उद्देश मातीमोल
Just Now!
X