23 September 2020

News Flash

सांस्कृतिक कार्यक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

वन्यजीव संवर्धनासारख्या गंभीर विषयाचे साध्या सरळ पद्धतीने सादरीकरण केल्यास अधिक परिणामकारक प्रभाव पाडता येतो, हे शाळकरी मुलांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक

| October 10, 2014 03:07 am

वन्यजीव संवर्धनासारख्या गंभीर विषयाचे साध्या सरळ पद्धतीने सादरीकरण केल्यास अधिक परिणामकारक प्रभाव पाडता येतो, हे शाळकरी मुलांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून स्पष्ट झाल्याचे मत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख)ए.के. सक्सेना यांनी व्यक्त केले.
वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित वन्यजीव सप्ताहाच्या सांगता सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे प्रमुख बी. मजुमदार होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए.के. निगम, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए.एस.के. सिन्हा व्यासपीठावर होते.
वन्यजीव सप्ताहादरम्यान १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सातही दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सांगता सोहळ्याप्रसंगी विविध शाळा व महाविद्यालयाच्यावतीने नृत्यनाटिका, पथनाटय़, पोवाडा, नृत्य असे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एन.के. अकादमी कोराडी यांनी सादर केलेल्या ‘नदी की आत्मकथा’ या नृत्यनाटिकेस प्रथम, सांदीपनी स्कूलने सादर केलेल्या ‘एक खड्डा’ या नाटिकेस द्वितीय आणि आंबेडकर कॉलेज वर्धा व गुरू हरकिशन स्कूल यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. याप्रसंगी वने व वन्यजीव विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनरक्षक, वनमजूर आणि वनपाल दर्जाच्या राज्यभरातील २३ कर्मचाऱ्यांना विशेष स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लघुपटासाठी विशेष मदत केल्याबद्दल या विषयातील तज्ज्ञ डॉ. रुद्रादित्य (हिमाचल प्रदेश) यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षकांनी तयार केलेल्या ‘वन्यजीव मार्गदर्शक’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ए.के. सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच फेसबुकच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. पॉवरपॉईंट सादरीकरण स्पध्रेतील विजेत्या डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी व सेंटर पॉईंट स्कूल वर्धमाननगर यांना संयुक्तरित्या प्रथम, अमरावती सेंटर पॉईंट स्कूलला द्वितीय आणि सांदीपनी स्कूल यांना तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2014 3:07 am

Web Title: wildlife week celebrated with cultural events
टॅग Wildlife
Next Stories
1 रुबीना पटेल यांना बाबुराव सामंत पुरस्कार
2 अवैध दारू विकणाऱ्या २० आरोपींना अटक
3 कर्मचारी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय समन्वय समितीचे धरणे
Just Now!
X