केंद्रीय मंत्री नितीन गडकरींप्रमाणेच पदवीधरांच्या मतदारसंघात आपण विकासाचे राजकारण करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित तरुणांच्या भविष्यासाठी काम केलीा जातील, असे आश्वासन नागपूर पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.अनिल सोले यांनी दिले आहे. येत्या २० जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रा.सोले बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडेअध्यक्षस्थानी होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयाप्रमाणेच आपला विजय निश्चित आहे, अशी खात्री देत प्रा.सोले म्हणाले की, भाजपने दिलेले आश्वासन अंमलबजावणीपयर्ंत पोहोचविले आहे. या मतदारसंघातील कामाचा आदर्श राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी घालून दिला आहे. त्यांचा, तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस यांचा वारसा चालविण्याची जबाबदारी आली आहे. ती आपण समर्थपणे पार पाडू. येथून आमदार झाल्यावर वर्षभरात काय काम केले, त्याचा आढावा आपण दरवर्षी सादर करू. देशात प्रथमच तरुणांच्या आकांक्षेचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे पदवीधरांच्या शिक्षण व रोजगाराच्या संधीबाबत अधिक प्रयत्न होतील, अशी हमी त्यांनी दिली. माजी खासदार विजय मुडे म्हणाले की, जनसंघाच्या काळापासून या मतदारसंघात स्वच्छ व काम करणाऱ्या व्यक्तीला विजय मिळत आलेला आहे. नितीन गडकरींचा सन्मान वाढविण्यासाठी प्रा.सोले यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, अर्चना वानखेडे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन मिलिंद भेंडे व सुनिल गफोट यांनी केले.