News Flash

द्रोणागिरीत जड वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू

उरणमधील द्रोणागिरी परिसरात रविवारी दुचाकीला जड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला

| July 7, 2015 07:16 am

उरणमधील द्रोणागिरी परिसरात रविवारी दुचाकीला जड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. डीआरटी परिसरात हा अपघात झाला.
उरणच्या वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहतीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले किशोर जाधव (२५) व सिद्धिका जाधव (२२) हे नवदाम्पत्य आपल्या घरी परतत होते. आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पागोटे परिसरातील डीआरटी गोदामाच्या वळणावरून येणाऱ्या जड वाहनाने वळण घेताना दुचाकीला धडक दिली. दुचाकी जड वाहनाखाली गेल्याने दुचाकीवर असलेले किशोर जाधव व सिद्धिका हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघात गंभीर असल्याने पुढील उपचारांकरिता पनवेल येथील लाइफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच सिद्धिका हिचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक किशोरवर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पुन्हा एकदा जड वाहनांच्या बेदरकारीमुळे होणाऱ्या अपघातात जीव गमावावा लागल्याने शासनाने अपघात टाळण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 7:16 am

Web Title: woman dead in dronagiri
Next Stories
1 हॉटेल व्यावसायिकांचा मोकळ्या जागेवरही डोळा
2 नवी मुंबईत १०९७ मुले शाळाबाह्य़
3 वीज कंत्राटदारावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार
Just Now!
X