19 September 2020

News Flash

‘त्या’ महिला सुरक्षा रक्षकाचा खूनच

मृतावस्थेत आढळून आलेल्या ‘त्या’ महिला सुरक्षा रक्षकाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

| April 23, 2015 12:43 pm

मृतावस्थेत आढळून आलेल्या ‘त्या’ महिला सुरक्षा रक्षकाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रुक्साना बेगम मोहम्मद याकुब शेख (रा. भदंत कौसल्यायन नगर) हे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून ती सुरक्षा जवान म्हणून नोकरी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून पिवळी नदीजवळील लघु उद्योग परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी तिला रात्रपाळीत तैनात करण्यात आले होते. रविवारी रात्री ती नेहमीप्रमाणे कामावर आली. सोमवारी सकाळी दिवसपाळीत असलेली सुरक्षा रक्षक कामावर आली तेव्हा रुक्साना तिला मृतावस्थेत आढळली. तिने लगेचच कंपनीतील पर्यवेक्षकाला कळविले. या घटनेची माहिती समजल्यानंतर यशोधरा नगर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले. मृत रुक्सानाच्या गळ्याजवळ एक जखम होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह रुग्णालयात पाठविला होता.
रुक्सानाचा मृत्यू गळा दाबल्याचे शव विच्छेदनात स्पष्ट झाले. तसा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर यशोधरनगर पोलिसांनी रुक्सानाच्या खुनाप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 12:43 pm

Web Title: woman security guard murdered
Next Stories
1 मिहानमध्ये बोइंगचे पहिले विमान उतरले
2 संजय जोशींसाठी शक्तिप्रदर्शन,स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठ
3 उन्हापासून काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
Just Now!
X