31 May 2020

News Flash

टेम्पोच्या धडकेने महिला ठार

नाशिकरोड परिसरात रस्ता ओलांडत असताना टेम्पोची धडक बसून एक महिला जागीच ठार झाली.

| May 29, 2015 11:39 am

नाशिकरोड परिसरात रस्ता ओलांडत असताना टेम्पोची धडक बसून एक महिला जागीच ठार झाली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या मुक्ताईनगर येथील रहिवासी कासाबाई वसंत बोंबरकर (५४) काही कामानिमित्त नाशिक येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. बुधवारी नेहरूनगर प्रवेशद्वाराकडे जात असताना समोरून भरधाव टेम्पो आला. या टेम्पोची धडक रस्ता ओलांडणाऱ्या कासाबाई यांना बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गर्दीचा फायदा घेऊन टेम्पोचालक पळून गेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तशीच स्थिती नाशिक-पुणे महामार्गावर असल्याचे या अपघाताने अधोरेखित केले आहे. शहरात महामार्गावरून मार्गक्रमण करताना वेगमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. तथापि, वाहनधारक तिचे पालन करत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळते. त्यात अवजड वाहनांची वाहतूक, चौकाचौकात होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
या बिकट स्थितीकडे वाहतूक पोलीस झोळेझाक करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2015 11:39 am

Web Title: women dead in accident
Next Stories
1 नाशिकरोड कारागृहातून कैदी पसार
2 ‘त्या’ पोलिसांवर कारवाईसाठी महिला सरपंचाचा उपोषणाचा इशारा
3 कुंभमेळ्यात वीज, पाणीटंचाईची भीती
Just Now!
X