‘आजच्या स्त्रीच्या समानतेसाठी स्वावलंबनाबरोबरच आíथक समानतासुद्धा मिळण्याची नितांत गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित ‘भारतीय स्त्रीची समानतेची आस : वचने, समस्या व भविष्य’ या विषयावरील आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग, प्रा. प्रियंवदा टोकेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
परिषदेच्या प्रमुख प्रा. प्रियंवदा टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेतील लेखांच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तन्वी राऊत यांनी, तर आभार डॉ. सुजारॉय अब्राहम यांनी मानले. या राष्ट्रीय परिषदेला भारतातील अनेक महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.