महिलेला शस्त्राचा धाक दाखवून लुटले
पिस्तूल आणि तलवारीच्या धाकावर एका भाजी विक्रेत्या महिलेला गुंडांनी लुटल्याच्या घटनेने शहरात जोरदार खळबळ निर्माण झाली असून आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा मोठा मोर्चा मध्यरात्री पोलीस ठाण्यावर धडकल्याची घटना बुधवारी येथे घडली.
या संबंधीची माहिती अशी की, यशोधरा रमेश वाघमारे (३५) ही भाजी विक्रेती महिला जाजू चौकात भाजी विकत असताना दोन गुंडांनी तिला तलवारीचा आणि पिस्तूलचा धाक दाखवून ७०० रुपयांनी लुटले. या घटनेने भयभीत झालेल्या या परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांनी पटापट दुकाने बंद करून घरची वाट धरली. रात्री या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी संतप्त होऊन वडगाव रोड पोलीस ठाण्यावर आरोपींच्या अटकेसाठी धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रवीण दिवटे, पंकज मेश्राम, विकास मोटघरे, अॅड. राजेंद्र महाडोळे यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकत्रे देखील होते. आरोपींना त्वरित अटक करण्याच्या घोषणा महिलांनी दिल्या. ठाणेदार सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक नरेश िपपळकर आणि पोलिसांचा एक ताफा रात्रीच आरोपींच्या अटकेसाठी रवाना झाला तेव्हा कुठे मोच्रेकरी महिला घरी परतल्या. या प्रकरणी पोलिसांनी मुन्नाभाई ठाकूर आणि सुनील देवतळे या दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत