माणसांनी आपला संवाद प्रभावी होण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर केला ते म्हणजे शब्द होय, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित डॉ. वि.भि. कोलते उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेत बोलत होते.
 ‘शब्दाच्या पोटात हजारो वर्षांचा इतिहास’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. यावेळी माणसाने शोधून काढलेले संवादाचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द होय. असे सांगत शब्दांना हजारो लाखो वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन काळापासून त्याची सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांनी आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, असे एका ओळीत शब्दांचे सामथ्र्य मांडल्याचे त्यांनी सांगितले.
लाखो वर्षांंचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास प्राणी, पक्षी वा मानवांचे अवशेष गाडले जातात. त्या गाडल्या गेलेल्या अवशेषांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला विद्यापीठ गीताने सुरुवात झाली. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे तसेच कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शैलेंद्र लेंडे यांनी केले.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!