News Flash

हिंगोलीत कामाला लागा!

हिंगोलीतील लोकसभेच्या जागेवरून दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मात्र, गुरुवारी सूर्यकांता पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.

| February 21, 2014 01:55 am

हिंगोलीतील लोकसभेच्या जागेवरून दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मात्र, गुरुवारी सूर्यकांता पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या वेळी िहगोलीची जागा राष्ट्रवादीकडेच असून कामाला लागा, अशा सूचना पवार यांनी दिल्याचा दावा नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी या संदर्भात माहिती देताना केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत िहगोलीची जागा पूर्वी राष्ट्रवादीकडे होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी परावभ केला. ही जागा आमदार राजीव सातव यांना सोडली जाईल, अशी रचना दिल्ली दरबारी होत असल्याची चर्चा हिंगोलीत गेल्या वर्षांपासून होत आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून ही जागा काँग्रेसला सोडायची नाही, यावर सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजी माने चांगलेच आडून बसले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त वेळोवेळी झालेल्या बठकीत ही जागा राष्ट्रवादीला न सुटल्यास सूर्यकांता पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतीलच, तसेच काँग्रेसच्या सहकार्याची गरज नाही, असे वक्तव्य िहगोलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बठकीत वारंवार केले जात होते. मात्र, आता पवारांच्या भेटीत नव्याने कामाला लागाच्या सूचना मिळाल्याचा दावा केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:55 am

Web Title: work start in hingoli order of pawar
Next Stories
1 लोकसभा उमेदवारीसाठी लातुरात काँग्रेसकडून मतदार यादीची तयारी
2 नायगाव, भोकरमध्ये उद्यापासून ४ सभा
3 आडते मालामाल, शेतकरी कंगाल!
Just Now!
X