26 October 2020

News Flash

टेम्पोच्या धडकेने कामगार ठार

एमआयडीसीतील बोल्हेगाव फाटय़ाजवळ टेम्पोची धडक बसून कामगाराचा मृत्यू झाला. ओमप्रकाश दशरथ सिंग (वय ३०, रेणुकानगर, बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे.

| July 13, 2013 01:46 am

एमआयडीसीतील बोल्हेगाव फाटय़ाजवळ टेम्पोची धडक बसून कामगाराचा मृत्यू झाला. ओमप्रकाश दशरथ सिंग (वय ३०, रेणुकानगर, बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. काल रात्री हा अपघात झाला. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश हा क्लासिक व्हील्स कंपनीत कामाला होता. रात्री तो सायकलवरून औषध आणण्यासाठी जात असताना टेम्पोने (एमएच १७ के ११०५) धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. जखमी ओमप्रकाशचा आज सकाळी औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:46 am

Web Title: worker killed in tempo collision
टॅग Killed,Midc
Next Stories
1 तीन मजुरांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
2 ‘अधिका-यांना वठणीवर आणावे लागेल’
3 नगर शहरात दिवसभर आषाढसरी
Just Now!
X