01 October 2020

News Flash

शरीरसौष्ठव प्रकारात औरंगाबादचे राजपूत जागतिक क्रमवारीत पाचवे

शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारातील पोलिसांच्या जागतिक स्पर्धेत (वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०१३) औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक पथकातील पोलीस नाईक वासुदेव पद्मनाभन राजपूत यांनी पाचवे

| August 18, 2013 01:50 am

शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारातील पोलिसांच्या जागतिक स्पर्धेत (वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०१३) औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक पथकातील पोलीस नाईक वासुदेव पद्मनाभन राजपूत यांनी पाचवे स्थान मिळविले. लंडन शहराजवळील बेलफास्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत ५४ देशांनी सहभाग नोंदविला.
राजपूत यांनी ४० ते ४९ हा वयोगट, तसेच उंची १६२ ते १७२ सें.मी. या गटात सहभाग घेतला. स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस विभागाच्यावतीने दोन पोलीस स्पर्धक पाठविण्यात आले होते. पोलीस नाईक राजपूत (वय ४७, बक्कल नं. २२३) यांनी शरीरसौष्ठव प्रकारात अन्य स्पर्धकांना मागे टाकत ही कामगिरी केली. पोलीस आयुक्त संजयकुमार, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, रामेश्वर थोरात यांच्यासह अनेकांनी या यशाबद्दल राजपूत यांचे अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 1:50 am

Web Title: world police fier games 2013
टॅग Aurangabad
Next Stories
1 शामप्रकाश देवडा यांना हिंगोलीकरांची श्रद्धांजली
2 विलासरावांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभारण्याचे आव्हान- द्वादशीवार
3 विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात
Just Now!
X