मुंलुंडच्या आय. ई. एस्. माध्यमिक शाळेच्या सभागृहात ‘लोकसत्ता यशस्वी भव’चा पुस्तक वितरण समारंभ आमदार चरणसिंह सप्रा यांच्या हस्ते नुकताच पार पडला. नियोजनबद्ध विषयाचे सखोल ज्ञान व ‘लोकसत्ता यशस्वी भव’ची साथ यामुळे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठणे सहजशक्य होईल, असा विश्वास सप्रा यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते कैलास पाटील, गौतम जैन, किशोर मुंडेकर, ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी अमेय जाधव, समुपदेशक डॉ. गीता सबनीस, के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख विनायक सबनीस तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांकडूनच करण्यात आले. श्रेया दातार, श्रुतिका निलख, सतलज म्हात्रे, ओमकार पेडामकर, शिवानी नार्वेकर या विद्यार्थ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. हर्षदा देवधर आणि राजेश सोनार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले. ईशस्तवन व स्वागतगीत मनाली परब, हर्षदा देवधर, अलका कावले व ज्ञानेश्वर पवार या शिक्षकांनी सादर केले. मुलुंड येथील लक्ष्मीबाई इंग्रजी माध्यम व नलिनीबाई दोडे विद्यालयातही पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.  

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश