मिळकत कागदपत्रावर नाव लावण्यासाठी आवश्यक ते दस्तावेज दिले असतानाही तीन हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या यावल येथील परीक्षण भूमापन अधिकाऱ्यास कार्यालयातच अटक करण्यात आली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुसयाबाई भोंडवे यांच्या मृत्यू पत्रान्वये मिळकत पत्रावर विजया जाधव यांचे नाव लावण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह यावलचे अतुल पाटील यांनी अर्ज केला होता. तथापि, वेळोवेळी पाठपुरावा करूनही हे काम करण्यासाठी भूमापक अधिकारी चंद्रशेखर वारुळे टाळाटाळ करीत होता. पाटील यांनी कार्यालयात जाऊन वारूळेशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता वारुळेने काम करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. अखेर सहा हजारात तडजोड होऊन तीन हजार रुपये वारुळेला लगेच देण्यात आले. उर्वरित रक्कम देण्यापूर्वी पाटीलने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.