बँकिंग क्षेत्रातील तीव्र स्पध्रेतही पारदर्शी कारभारामुळे सन्मती सहकारी बँकेची आíथक वर्षांतील उलाढाल तब्बल १९६ कोटी ६० लाखांवर पोहोचली असून बँकेला १ कोटी ३६ लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील व उपाध्यक्ष अजित कोईक यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे पाचवी शाखा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
कर्मचाऱ्यांना साडेसतरा टक्के इतकी वेतनवाढ देण्यात आल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, केवळ बँकिंग व्यवसाय हाच संस्थेचा उद्देश नसून इतर उपक्रमांद्वारे बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. बँकेच्या ठेवी ९७ कोटी ७८ लाखांवर पोहोचल्या असून ६३ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. भागभांडवल १ कोटी ६७ लाख रुपये तर राखीव निधी ५ कोटी ६१ लाख असून गुंतवणूक ३५ कोटी इतकी आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहे. बँकेचे लवकरच स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर होत असून याठिकाणी कोअर बँकिंग प्रणाली, इंटरनेट बँकिंग, एटीएम यासह सर्वच अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. बँकेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तर पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून एक सभासद एक झाड ही गतवर्षी राबविलेली संकल्पना यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, संचालक चंद्रकांत पाटील, सौ. जयश्री चौगुले, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. ए. ए. धरणगुत्ते, महेश कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.