योग गुरूकुल विद्यापीठाचे मुख्य योगाचार्य विश्वास मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योगाचे महत्व पटवून देणारे शिबीर उत्साहात पार पडले.
मंडलिक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी या शिबीराचे आयोजन केले. दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यातील ताणतणावाचे योग्य रितीने नियंत्रण करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच योग्य आहाराचे महत्व पटवून देणे हे उद्दिष्ट  समोर ठेवून ‘निरोगी जीवनाकरिता योग’ या विषयानुसार शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडलिक यांनी दिली. या वेळी डॉ. विद्या देशपांडे यांनी ‘मुलींचा आहार आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
संस्थेतर्फे विद्यार्थिनींचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून निरनिराळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे हे शिबीर असल्याचे संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. सूत्रसंचालन संस्थेचे गटनिदेशक दीपक बाविस्कर यांनी केले. आभार जयंत बागूल यांनी मानले.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा