News Flash

योगेश्वर चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन

चिकलठाण (तालुका कन्नड) येथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी योगेश्वर एकनाथराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

| July 10, 2013 01:52 am

योगेश्वर चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन

चिकलठाण (तालुका कन्नड) येथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी योगेश्वर एकनाथराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात औरंगाबादच्या छत्रपती महाविद्यालयातील प्रा. डॉ. शंतनू व निरंजन ही दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. विज्ञानाची पदवी प्राप्त केलेल्या योगेश्वर चव्हाण यांनी शेती, समाजकारण, राजकारण या माध्यमातून गावच्या विकासात मोठे योगदान दिले. सुमारे ४० वर्षे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यासोबत काम करताना २००४ व २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. कन्नड साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:52 am

Web Title: yogeshwar chavan is no more
टॅग : Aurangabad
Next Stories
1 ‘विद्यार्थ्यांच्या मोबाईल प्रतिबंधावर प्रस्ताव नाही’
2 मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबीयांत जुंपली
3 ‘अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न सक्षम यंत्रणा, जागरूक नागरिकच सोडवू शकतील’
Just Now!
X