20 August 2019

News Flash

‘यू, मी अ‍ॅण्ड चाय’..

चहा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. पण चहा हे फक्त एक पेय नाही तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान असतं.

| August 27, 2015 12:47 pm

चहा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. पण चहा हे फक्त एक पेय नाही तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान असतं. ’चहा’ ही दोन अनोळखी माणसांमधल्या नात्याची सुरुवात असू शकते आणि मग त्यांच्यामधल्या गहिऱ्या होत जाणाऱ्या नात्याचा ‘चहा’ हा एक साक्षीदार असतो. या चहाभोवती अनेक आठवणी िपगा घालत असतात. मित्र-मत्रिणींबरोबर कॉलेज कट्टय़ावर घेतलेला चहा, ऑफिसमध्ये घेतलेला चहा, पावसात ओलेचिंब होत घेतलेला चहा अशा अनेक आठवणी. यातलंच एक अतिशय सुंदर, नाजूक, कधी हवंहवंसं वाटणारं आणि कधी आयुष्यभराची सल देऊन जाणारं हळुवार नातं – त्याचं आणि तिचं ! ‘चहा’च्या साक्षीने गुंफलं जाणारं हे गुलाबी नातं उलगडून दाखवणारा एक अगदी रेफ्रेिशग अनुभव देणारा कार्यक्रम ‘यू, मी अ‍ॅण्ड चाय’ येत्या रविवारी मुंबईत होणार आहे.अगदी ताजी, नवी कोरी संकल्पना असलेला, नवीन कविता, ठेका धरायला लावणारे नवे कोरे श्रवणीय संगीत आणि मनमुराद गप्पागोष्टींचा, पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला हा कार्यक्रम पुण्यातील स्वरभूमीची निर्मिती आहे. या कार्यक्रमाचा मुंबईतला पहिलाच प्रयोग रविवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे होणार आहे.चहाच्या रंगानं, गंधानं भारलेली ही मफील मनानं तरुण असलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडणारी अशी आहे. कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि संगीत धनश्री गणात्रा, आयोजक स्नेहा ताम्हनकर आणि सादरकत्रे अवंती मेहता, आशुतोष जोशी, तुषार परदेशी, अभिजित आणि धनश्री गणात्रा. प्रवेशिका साहित्य संघ मंदिर येथे दिनांक २७ ऑगस्टपासून उपलब्ध.
संपर्क – स्नेहा- ९७६५८२२६२२, प्रज्ञा- ९२२३३७२७७५, संदेश- ९८६९१८१४६०.

First Published on August 27, 2015 12:47 pm

Web Title: you me and tea