शहरातील सागर परदेशी या तरुणाचा काल रात्री रेल्वेचा रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संजयनगर व नॉर्दन ब्रँचला जोडणा-या रेल्वे भूमिगत पुलाचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या विरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नगरपालिकेने काम त्वरित पूर्ण न केल्यास भाजपच्या वतीने आहे तसा पूल वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संजयनगर आणि नॉर्दन ब्रँचला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या पुलाजवळ एकत्र येऊन घोषणाबाजी करत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली. शहराध्यक्ष मारूती िबगले म्हणाले, रेल्वे लाईनमुळे श्रीरामपूर शहराचे दोन भाग झाले आहेत. न. प. निवडणुकच्या काळात सत्ताधाऱ्यांनी संजयनगर, नॉदर्न ब्रँचला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करून काम सुरू केले होते, परंतु काम पूर्ण केले नाही. हा पूल सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनू पाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेने तातडीने हा पल तातडीने वाहतुकसाठी खुला करावा अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या संदर्भात नगरपालिकेला निवेदन देण्यात आले असून यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस गणेश िशदे, शहर उपाध्यक्ष संजय यादव, भाऊसाहेब राहीले, विशाल त्रिवेदी, श्रीराम त्रिवेदी, स्वप्नील सोनार, आदेश मोरे, गणेश अस्वर, ज्ञानेश्वर जाधव, गणेश मोरे, विनय त्रिवेदी, विजय घोरपडे, संतोष यादव, संदीप शिंगारे, विजय मगर, अभिजित वधवा, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.