27 November 2020

News Flash

महिला सुरक्षेनिमित्त ठाण्यात तरुणांची बुलेट रॅली

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, महिलांच्या सुरक्षिततेचा ऐरणीवर आलेला प्रश्न याविषयी शासन, प्रशासनासह समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील चौदा तरुणांच्या एका

| April 27, 2013 02:01 am

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, महिलांच्या सुरक्षिततेचा ऐरणीवर आलेला प्रश्न याविषयी शासन, प्रशासनासह समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील चौदा तरुणांच्या एका गटाने ठाणे शहरात बुधवार, १ मे रोजी बुलेट गाडीवरून महिला सुरक्षितता रॅलीचे आयोजन केले आहे.
या उपक्रमात एकूण दीडशे तरुण बुलेट गाडय़ांसह सहभागी होणार आहेत. महिला सुरक्षिततेबाबत मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या प्रमाणात ठाणे परिसरात अशा उपक्रमांचे प्रमाण खूप कमी असल्याने ठाणे शहरात महिला सुरक्षा रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती एक संयोजक अभिमन्यू निंबाळकर यांनी दिली.
१ मे रोजी सकाळी दहा वाजता कोपरी येथील गुरुद्वारापासून बुलेट रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही रॅली भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मंदिर रोड, तलावपाळी, आंबेडकर रोड, वृंदावन, माजिवडा, हिरानंदानी मेडोज, मानपाडा, घोडबंदर येथील हायपर सिटी मॉल येथे समाप्त होणार आहे. तरुणांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या या रॅलीला राजकीय सहभागापासून दूर ठेवण्यात आले आहे, असे अभिमन्यू यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क, अभिमन्यू ९००४०१३०६३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:01 am

Web Title: youth bullete rally for women security
टॅग Rally
Next Stories
1 ‘आंबेडकर जयंती कशासाठी याचे आत्मचितंन होण्याची आवश्यकता’
2 वाडय़ातील खानिवली आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
3 दुर्मीळ मासे बघायचेयत..
Just Now!
X