28 November 2020

News Flash

दगडांनी ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघे ताब्यात

अंबाझरी परिसरात सुभाष नगर टी पॉइंटजवळ एका तीस वर्षीय युवकाची काही अज्ञात आरोपींेनी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या केल्याने या भागात आज सकाळी तणावाचे वातावरण होते.

| April 27, 2013 03:05 am

अंबाझरी परिसरात सुभाष नगर टी पॉइंटजवळ एका तीस वर्षीय युवकाची काही अज्ञात आरोपींेनी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या केल्याने या भागात आज सकाळी तणावाचे वातावरण होते. या घटनेत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दिलिप मोहनदास महतो मृतकाचे नाव आहे. तो आई, पत्नी व दोन मुलासह नेल्को सोसायटीत राहत होता.  सुभाषनगर परिसरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद असल्यामुळे दिलीप काही मित्रासोबत गेला. दर्शन घेतल्यावर तो महाप्रसाद वितरण कार्यक्रमात तो सहभागी झाला. रात्री ११ वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू होता. दरम्यानच्या काळात महाप्रसादाच्यावेळी काही युवकांशी त्याचा वाद झाला आणि वादाचे रूपांतर मारामारीत झाले. दरम्यान, मंदिरातील काही वरिष्ठ मंडळीनी मध्यस्थी करून तो वाद सोडविला आणि वातावरण शांत झाले. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास महाप्रसादाचा कार्यक्रम संपल्यावर दिलीप काही मित्रांसोबत सुभाष नगर चौकात गप्पा मारत बसला होता. रात्री १ वाजता तो सुभाषनगरातून घराकडे जात असताना काही अज्ञात युवकांनी त्याला अडवून तीक्ष्ण शस्त्राने भोसकले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी परिसरात शांतता होती. त्यामुळे हा प्रकार लोकांच्या लक्षात आला नाही. रस्त्यावर दिलीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटना घडल्यानंतर जवळपास सुमारे तासभराने त्या भागातून काही तरुण या भागातून जात असताना त्यांना सुभाषनगर टी पॉइंट चौकात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्यामुळे त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात कळविले. घटनास्थळी पोलीस आल्यावर खिशातील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. त्यांनी दिलीपच्या घरी संपर्क करून त्याच्या भावाला घटनेची माहिती देताच त्याचे पत्नी, भाऊ, आई घटनास्थळी आले. दिलीपला लागलीच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिलीपचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी मेडिकलमध्ये पाठवण्यात आले.  
ज्या मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्या मंडळाततील अनेक कार्यकर्ते त्याचे मित्र होते. त्यामुळे तो महाप्रसाद वितरण कार्यक्रमात सहभागी झाला होता. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात सकाळी तणावाचे वातावरण होते. महाप्रसादाच्यावेळी ज्यांच्याशी वाद झाला होता त्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेची चौकशी करीत आहे.
शहरातील विविध भागात वाढते खून, चोरी आणि लुटमारीच्या घटना बघता प्रत्येक पोलीस ठाण्याला काही दिवसापूर्वी गस्त ठेवण्यासाठी वाहन देण्यात आली. रात्रीच्यावेळी संबंधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वस्त्यांमध्ये कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ही वाहने रात्री गस्त घालण्यासाठी दिली असताना गेल्या काही दिवसात रात्रीच्यावेळी चोरी, खून आणि लुटपाटीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या गाडय़ांचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:05 am

Web Title: youth murder by stone bruise three arrested
Next Stories
1 चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच अचानक बंद
2 राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे हटाव मोहीम
3 बायोगॅस प्रकल्प उभारणीत नागपूर जिल्ह्य़ाची लक्ष्यपूर्ती
Just Now!
X