News Flash

प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या, प्रेमी युगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमप्रकरणातून झालेल्या वादात एका युवकाची हत्या केल्यानंतर आरोपी युवकाने प्रेयसीसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगारपेठ ते ढाणा

| February 5, 2014 09:04 am

प्रेमप्रकरणातून झालेल्या वादात एका युवकाची हत्या केल्यानंतर आरोपी युवकाने प्रेयसीसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगारपेठ ते ढाणा मार्गावर एका शेतात सोमवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी योगेश महादेव शेरेकर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. योगेश दिगांबर धार्मिक (१७, रा.पुसला) असे मृताचे नाव आहे.
योगेशचा मृतदेह सोमवारी सायंकाळी पुसलाच्या नजीक ढाणा येथील एका शेतात मजुरांना आढळून आला. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर काही वेळातच जवळच खापरखेडा येथील एका शेतात आरोपी योगेश शेरेकर आणि त्याची १६ वर्षीय प्रेयसी बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
योगेश धार्मिक हा योगेश शेरेकर आणि त्याच्या प्रेयसीसह सोमवारी दुचाकीने पुसला येथून ढाणा मार्गावर गेले होते. या ठिकाणी एका शेतात ते थांबले. त्यावेळी योगेश शेरेकर आणि योगेश धार्मिक यांचा वाद झाला. याच वादातून योगेशे शेरेकरने योगेश धार्मिक याच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह शेतातच टाकून योगेश शेरेकर आणि त्याची प्रेयसी दोघेही पळून गेले. या प्रकरणात पकडले जाण्याच्या भीतीने दोघांनीही खापरखेडा येथे एका शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
आरोपी आणि त्याची प्रेयसी दोघेही पुसला येथे राहणारे आहेत. योगेश धार्मिक देखील याच गावात राहणारा होता आणि दोघांच्याही परिचयाचा होता. या प्रकरणात योगेश धार्मिक याचा चुलतभाऊ दिनेश पुरुषोत्तम धार्मिक
याच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट
पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 9:04 am

Web Title: youth murdercouple attempted suicide
Next Stories
1 महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांच्या मोहिमेला तुर्त पूर्णविराम
2 ‘पोलीस संरक्षणात कर्जबुडव्या नेत्यांच्याही मालमत्ता जप्त करा’
3 दाखले मिळण्यासाठी लोकांना त्रास होऊ देऊ नका -थोरात
Just Now!
X