10 April 2020

News Flash

बालकांच्या मोफत शिक्षण कायद्याबाबत जिल्हा परिषदेसह महापालिकेची विशेष सभा

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती होण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार येत्या गुरूवारी, २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी,

| November 26, 2012 09:50 am

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती होण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार येत्या गुरूवारी, २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, ३० नोव्हेंबर रोजी सोलापूर महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती लोकप्रतिनिधींना होण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबतचे आदेशवजा पत्र नगरविकास विभागाने पाठविले आहे. त्यानुसार येत्या २९ रोजी जिल्हा परिषदेची, तर ३० रोजी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका नगरसचिव कार्यालयाने या विशेष सभेची विषय पत्रिका आयुक्तांच्या टिप्पणीसह प्रसिध्दीला दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2012 9:50 am

Web Title: zp and corporation conducts special meeting on free education for children for child
टॅग Kids
Next Stories
1 किसन वीर साखर कारखान्याचा उसाला २६२१ रुपये भाव जाहीर
2 आर. एम. मोहिते इंडस्ट्रीजमधील संप वाटाघाटीनंतर मागे
3 विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. गुरव
Just Now!
X