१०० क्विंटल गहू परभणीत पकडला

जिंतूर तालुक्यात केलेल्या कारवाईत १२६ क्विंटल सरकारी धान्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी चार आरोपींना जिंतूर न्यायालयाने दि. २५पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

जिंतूर तालुक्यात केलेल्या कारवाईत १२६ क्विंटल सरकारी धान्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी चार आरोपींना जिंतूर न्यायालयाने दि. २५पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, येथील औद्योगिक वसाहतीतील डी. के. फ्लोअर मिलमध्ये जाणारा १०० क्विंटल सरकारी गहू परभणी पोलिसांच्या दक्षता पथकाने शुक्रवारी दुपारी पकडला. गहू घेऊन जाणारा टेम्पो व गहू नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतला.
एमएच २६ डी ७२४१ या टेम्पोमधून डी. के. फ्लोअर मिलमध्ये हा गहू नेला जात होता. दक्षता पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता टेम्पोचालक शेख खाजा याने हा गहू सरकारी गोदामातून भरला असल्याचे सांगितले. त्यानंतर टेम्पोचालकांनी हा गहू लिलावात खरेदी केला असल्याचे कागदपत्र पोलिसांना दाखवले. त्यामुळे पोलिसांनी तहसीलदारांना या गव्हासंबंधी अहवाल देण्यास पत्र दिले. रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयाकडून कुठलाही अहवाल प्राप्त झाला नव्हता.
गुरुवारच्या कारवाईत बोरीजवळील आसेगाव येथील व्यापारी मदन झंवर याच्या आखाडय़ावर सरकारी गोदामातील धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. पथकाने आखाडय़ावर छापा टाकला. या वेळी तांदळाचे १५२ कट्टे व गव्हाचे १०० पोते असे १२६ क्विंटल धान्य आढळून आले. या प्रकरणी मदन सीताराम झंवर, सुनील मदनलाल झंवर, अनिल झंवर, पुरुषोत्तम शामसुंदर झंवर या चौघांविरुद्ध बोरी पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी या चौघांना जिंतूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जप्त धान्य बोरीच्या सरकारी गोदामात जमा करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 100 quintal wheet seized in parbhani

Next Story
तक्रार केली म्हणून विभागीय चौकशीचा ससेमिरा