फुकटय़ा प्रवाशांकडून १८ कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. मे महिन्यात या कारवाईत ३ लाख २१ हजार प्रवाशांकडून १८ कोटी २६ लाख रुपये दंड वसू

मध्य रेल्वेने फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. मे महिन्यात या कारवाईत ३ लाख २१ हजार प्रवाशांकडून १८ कोटी २६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात अडीच लाख प्रवाशांकडून १३ कोटी २९ लाख रुपये वसूल करण्यात आले होते.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची तिकिटे अन्य प्रवाशांच्या नावांवर करण्याची १७७ प्रकरणे आढळून आली होती. या प्रकरणात ४ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यंदाच्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात एकूण ६ लाख ४२ हजार फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून ३६ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख ६४ हजार प्रवाशांकडून २४ कोटी ३२ लाखांची वसुली करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 18 crore penalty recovered

ताज्या बातम्या