चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी २४ कोटींच्या ४२ प्रस्तावित रस्त्यांना राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाने मंजुरी दिली असून त्यापैकी चार कोटींपेक्षा अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ. जगदीश वळवी यांनी दिली. बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेंतर्गत येतात.
जिल्हा परिषदेवर विरोधकांची सत्ता असल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडथळा येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तापी नदीवरील विदगाव पुलाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी प्रस्तावित असून एक कोटी ६४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावल व चोपडा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्ते, त्यावरील पूल आदींचा कामात समावेश असल्याचे आ. वळवी यांनी सांगितले. महाराष्ट्र व मध्य प्रदेशलगत वाहणाऱ्या अनेर नदीवर पाच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…