जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या पुढाकारातून जिल्ह्य़ातील ६ बाजार समित्यांकडून ३ लाखांचा निधी जमविण्यात आला. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बुद्रूक) गावच्या सरपंच शीतल सरनाईक यांच्या पुढाकारातून गावात मदतफेरी काढून २१ हजार रुपये निधी जमा झाला.
सरपंच सरनाईक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पुंडलिकराव बल्लाळ यांनी दुष्काळग्रस्तांना काढलेल्या मदतफेरीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले. जमलेला २१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा केला जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक जाधवर यांच्या पुढाकारातून जिल्ह्य़ातील ६ बाजार समित्यांमार्फत सुमारे ३ लाख निधी जमा करण्यात आला. यात हिंगोली दीड लाख, वसमत ४० हजार, जवळाबाजार ४० हजार, सेनगाव २५ हजार, कळमनुरी २० हजार व आखाडा बाळापूर बाजार समितीने २५ हजार रुपयांची मदत केली.