तालुक्यातील ४६ सहकारी संस्थांमध्ये लवकरच निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ९७ व्या घटना दुरुस्तीमुळे अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत, पण या सर्व संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात घेण्याच्या दृष्टीने सहकार विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.
निवडणूक होणाऱ्या तालुकास्तरीय संस्थांमध्ये चोपडा तालुका शेतकरी साखर कारखाना, शेतकी संघ, सहकारी सूतगिरणी, चोपडा सहकारी औद्योगिक वसाहत यांचा समावेश आहे. तालुक्यातील वडगाव बुद्रुक, मजरेहिंगोणे, विचखेडा, मासलदे, बुधगाव, घोडगाव, अनवर्धे खुर्द, भवाळे, कुरबेल, सत्रासेन, चहार्डी, चौगाव, विरवाडे, नागलवाडी, कर्जाणे, मल्हारपूर, वेळोदे, आघवेल, मोहिदे आदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचीही निवडणूक होणार आहे.
याशिवाय लक्ष्मी महिला नागरी पतसंस्था, चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतसंस्था, संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती, अनिल काबरे बिगरशेती, स्वामी विवेकानंद पतसंस्था, चोपडा म्युनिसिपल सेवकांची पतसंस्था, शीतलनाथ ग्रामीण बिगरशेती, मुरलीधर नारायण पाटील ग्रामीण बिगरशेती, चोपडा र्मचट क्रेडिट सोसायटी, जाकीर हुसेन नागरी पतसंस्था, नामदेव महादू महाराज पतसंस्था, स्वामी समर्थ नागरी, देवनारायण नागरी, संताजी नागरी आदी पतसंस्थांचीही निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाची तयारी सुरू झाली आहे.