‘आजचा दिवस माझा’ हा मराठी चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माता संजय छाब्रिया, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखकद्वयींपैकी प्रशांत दळवी, अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री अश्विनी भावे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी ‘लोकसत्ता’ला भेट देऊन चित्रपटाविषयी, प्रमुख भूमिकांविषयी गप्पा केल्या. त्याचा सारांश..
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी
‘नायक’ या हिंदी सिनेमाचा अजिबात संबंध नसलेला हा सिनेमा आहे. आमचा नायक विश्वासराव मोहिते हा मुरब्बी राजकारणी आहे. मुख्यमंत्री म्हणून त्याचे पद धोक्यात आले असताना तो दिल्लीला जाऊन श्रेष्ठींची भेट घेऊन परततो. तोपर्यंत बहुतेक हे मुख्यमंत्री जाणार अशी चर्चा रंगलीय. परंतु, दुपारी मुंबईत विमानतळावर तो उतरतो आणि हेच मुख्यमंत्री राहणार हे सगळ्यांना कळून चुकते या नाटय़मय वळणावर सिनेमा सुरू होतो. आपल्याला ओळखीचा वाटावा असा हा राजकीय नेता दाखविला आहे. हा राजकीय नेता आता कसा वावरतो हे लक्षात घेऊन तो प्रवाह पटकथेत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्यस्त दिनक्रम, राजकारणाच्या धबडग्यात अशा काही घटना घडतात की, आपण नेमके काय करायला हवे, आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याचा विचार तो करू लागतो. मग एका सामान्य माणसाच्या कामासाठी तो सगळे पणाला लावायचा प्रयत्न करतो. प्रशासन, तो, त्याचा निर्णय, सगळी लोकशाही प्रक्रिया आणि जे आदर्शवत असण्याच्या शक्यता आहेत त्या नेमक्या कशासाठी असतात अशा प्रकारचा संघर्ष आहे. तो म्हणतो म्हणून कामे होतातच असेही नसते. नाही तर मुख्यमंत्र्याच्या एका आदेशावर, एका सहीवर काम झाले असते. पण अडथळे येत राहतात, त्यातून काही गंमत घडते, नाटय़ घडत जाते, सिनेमा घडतो. एका क्षणी सगळ्यांनाच असे जाणवते की असंही होऊ शकतं, हे शक्य आहे, खरे म्हणजे रोजच सर्वसामान्य माणसाची कामे अशा पद्धतीने व्हायला हवीत. तशा पद्धतीने कामे व्हावीत अशी राजकारणाची रचना आहे. पण तसं होतं का नेहमी, तर होत नाही. होऊ शकतं हे सिनेमा सांगतो.
अभिनेता सचिन खेडेकर ऊर्फ विश्वासराव मोहिते
लेखक प्रशांत दळवी
अभिनेत्री अश्विनी भावे
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2013 रोजी प्रकाशित
आजचा दिवस माझा
‘आजचा दिवस माझा’ हा मराठी चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माता संजय छाब्रिया, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखकद्वयींपैकी प्रशांत दळवी, अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री अश्विनी भावे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी ‘लोकसत्ता’ला भेट देऊन चित्रपटाविषयी, प्रमुख भूमिकांविषयी गप्पा केल्या. त्याचा सारांश..

First published on: 24-03-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aajcha divas maza