महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांना मंगळवारी त्यांची पत्रकार बैठक सुरू असताना ४ कार्यकर्त्यांनी काळे फासले. महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रस्ताव मंजूर का केले नाहीत, असा या कार्यकर्त्यांचा सवाल होता. मात्र, या घटनेमुळे व्यथित झालेल्या मानेंनी आपल्या विरोधात षड्यंत्र रचले जात असून, आपण निष्कलंक असल्याचे सांगत या प्रकरणी पोलिसात तक्रार न करण्याची भूमिका घेतली.
येथे मंगळवारी आयोजित केलेल्या भटक्या विमुक्त जाती, जमातींच्या मेळाव्यासाठी वसंतराव नाईक महामंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण माने आले होते. साताऱ्यात महिलांनी केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेल्या माने यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार बैठक आयोजित केली होती. साडेअकराच्या सुमारास ही बैठक सुरू असतानाच शहरातील आसाराम गायकवाड, शहाजी गायकवाड व त्यांच्या काही समर्थकांनी मध्येच घुसून माने यांना महामंडळाचे अध्यक्ष असताना फायली मंजूर का केल्या नाहीत, असा जाब विचारणे सुरू केले. याच वेळी काही कार्यकर्त्यांनी थेट मानेंच्या जवळ जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला व बैठक उधळली गेली.
माने यांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. आपल्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचले गेले आहे. मात्र, आपण निष्कलंक आहोत. या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून पोलिसात तक्रार करणार नसल्याचे माने यांनी सांगून टाकले.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या