शहादा तालुक्यातील पाणीटंचाईप्रश्नी प्रशासनाची चालढकल

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे.
काकर्दे दिगर आणि कहाटूळ येथील तीव्र पाणीटंचाईसंदर्भात प्रशासनास माहिती देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने जनतेत असंतोष आहे. काकर्दे दिगर येथे हातपंप बसवून पाणीटंचाई दूर झाल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापात अधिकच भर पडली.
डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत उपसभापती सुनील पाटील व इतरांसमवेत मनलेश जयस्वाल, काकर्दे दिगरचे सरपंच मंगलसिंग भिल, शत्रुघ्न भिल, भाईदास कोळी, प्रकाश पाटील आदींनी चर्चा केली. कहाटूळ येथे तातडीने कूपनलिका अधिग्रहित करणे तसेच काकर्दे दिगर येथे काटघर धरणाखाली विंधन विहीर घेण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आले. एप्रिल २०१२मध्ये फत्तेपूर-कुसूमवाडा रस्ता प्रश्नासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.
त्यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या प्रश्नावर मनलेश जयस्वाल हे ३० जूनपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन संबंधितांना देण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Administration ignoring on shahada taluka water shortage problem

ताज्या बातम्या