अनंत पावसकर यांनी लिहिलेल्या ‘आठवणीतली गाणी’ या पुस्तकाच्या ब्रेल लिपी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन एका कार्यक्रमात करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या अकोला येथील क्षितिज अंध, अपंग विरंगुळा, अध्ययन व पुनर्वसन केंद्राने ही ब्रेल आवृत्ती प्रकाशित केली आहे. ‘आठवणीतली गाणी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही लवकरच प्रकाशित होणार आहे. केंद्राच्या संचालिका मंजुश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि विद्या थावरे यांच्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने पुणे येथील निवांत अंध मुक्त विद्यालयातर्फेही मराठीतील काही साहित्य ब्रेल लिपीत रूपांतरीत करण्यात आले आहे. मुंबई येथील ‘स्पर्शज्ञान’ या स्वागत थोरात यांच्या ब्रेल मुद्रणालयात या ब्रेल लिपीतील साहित्याची छपाई केली जाणार आहे.