पत्रकारांवर होणारे सतत होणारे हल्ले पाहता पत्रकार संरक्षण कायदा आणावा, या मागणीसाठी अकोला शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघ व बहुजन पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील एक निवेदन दुपारी देण्यात आले.
या धरणे कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस शौकत अली मीरसाहेब, उपाध्यक्ष रवी टाले, प्रा.मधु जाधव, बहुजन पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष अनिल माहोरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.सुधाकर खुमकर, सरचिटणीस विशाल राजे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर, मिलिंद गायकवाड, श्रीकांत जोगळेकर, सचिन देशपांडे, दिलीप ब्राह्मणे, रामविलास शुक्ला, शैलेंद्र दुबे, डॉ.किरण वाघमारे, शंतनु राऊत, नीरज भांगे, प्रवीण ठाकरे, अ‍ॅड.निलिमा िशगणे, विजय केंदरकर,गणेश सोनोने, अंबादास तल्हार, विनय टोले आदींचा सहभाग होता.