scorecardresearch

Premium

मुंबई महापालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनने एक अभियान सुरू केले आहे. जे निवृत्तीवेतनधारक निवृत्तीनंतर शासकीय, महानगरपालिका अथवा तत्सम सेवेत असतील त्यांना निवृत्तीवेतनावर महागाई सहाय्य मिळत नाही.

मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनने एक अभियान सुरू केले आहे. जे निवृत्तीवेतनधारक निवृत्तीनंतर शासकीय, महानगरपालिका अथवा तत्सम सेवेत असतील त्यांना निवृत्तीवेतनावर महागाई सहाय्य मिळत नाही. त्यामुळे अशा व्यक्ती वगळून अन्य निवृत्तीवेतनधारकांना अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना किमान मूळ निवृत्तीवेतन १२०० रुपये, महागाई सहाय्य मिळून सध्या ४३०२ रुपये मिळणे गरजेचे आहे. कुटुंब वेतनधारकाचा मुलगा अथवा मुलगी अनुकंपा तत्त्वावर नोकरीत असेल तरीही त्यांना महागाई सहाय्य अनुज्ञेय आहे.
तथापि, अशा प्रकरणात महागाई सहाय्य मिळत नसल्याचे आढळून आले आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे ज्या निवृत्तीवेतनधारकांना, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ४३०२ रुपयांपेक्षा कमी निवृत्तीवेतन मिळत असल्यास अथवा अन्य कोणतीही समस्या असल्यास त्यांनी असोसिएशनच्या कार्यालयात म्हणजेच खोली क्रमांक ९, तळमजला, मुंबई महानगरपालिका, जी – उत्तर विभाग कार्यालय, जे. के. सावंत मार्ग, प्लाझा सिनेमाजवळ, दादर (प.), मुंबई २८ येथे दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत (शनिवार-रविवार आणि सुटीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, असे असोसिएशनने कळविले आहे. अधिक माहितीसाठी ब. बा. आवचार (९८३३७०२३९९) अथवा र. ना. शेर्लेकर (९८१९६३१००२) यांच्याशी संपर्क साधावा.

session Loksatta Arthabhan Income after retirement ville parle Thursday
निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळविता येणे शक्य! पार्ल्यात येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र
arrested newsclick editor journalist
‘न्यूजक्लिक’च्या संपादकांना सात दिवसांची पोलीस कोठडी
digital news channel managing editor get threat call
मुंबईः डिजिटल वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांना धमकी; अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
narayan murthy and sudha murthy
Narayan Murthy Success Story : IIT तील शिक्षणानंतर पत्नीकडून व्यवसायासाठी घेतलं १० हजारांचं कर्ज, आता आहेत ३७ हजार कोटींचे मालक

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Appeal by mumbai corporation to pention and family pention holder

First published on: 17-02-2013 at 12:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×