डोंबिवली येथील स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या शहरातील तरुण-तरुणींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
यंदा २०१४ ची शिष्यवृत्ती सुगम संगीत विभागासाठी आहे. निवड झालेल्यास दरमहा एक हजार रुपये असे पाच वर्षांसाठी साठ हजार रुपये देण्यात येतील. १८ ते २५ वयोगटातील डोंबिवलीत राहणाऱ्या उमेदवारांसाठीच ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. उमेदवारांनी संगीतविशारद अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गुरूकडून किमान पाच वर्षे शिक्षण घेतल्याचे शिफारसपत्र तसेच सुगम संगीत गायनाची ध्वनिफीत जोडणे आवश्यक आहे. परीक्षक ती ध्वनिफीत ऐकतीलच, शिवाय अंतिम निवडीआधी उमेदवारास प्रत्यक्ष सादरीकरणही करावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारास वर्षभराच्या रकमेचा धनादेश आणि प्रमाणपत्र दिले जाईल.  अधिक माहितीसाठी संपर्क-विनायक जोशी-९८२१२३७११३.   

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी